सावली
चिक्कूच्या झाडावर चढून,
पुन्हा एकदा खाली पडूयात!
हौदात पाय बुडवून,
गुपचूप दुपारी मासे पकडूयात.
झुडपातल्या फटीतून
शेजारी जाऊयात,
पुन्हा एकदा त्यांच्या झाडाचे
चोरून पेरू खाऊयात!
चाफ्याची फूले वेचुन,
ऊंच शिडीवरून
चोर दरवाज्याने गच्चीत लपून बसूयात!
आईच्या चाहाचा एक
गरम घोट घेऊयात...
मोगरा फुललेला असताना,
कोकीळ गुलमोहराच्या फांद्यांवर गात असायचा.
संक्रांतिचा वेल आकाशाला भिड़ायचा!
चला पुन्हा एकदा ती गाणी एकूयात!
लहानपणीच्या आठवणीत
कायमचे रमून जाऊयात!
जिन्याखाली भातुकली मांडूयात,
आवळा सुपारी खाता खाता,
पत्त्यांचे तीनशेचार डाव खेळूयात!
पावसाळ्यात छत्री घेऊन,
टाकीत पाणी भरले का ते बघूयात,
उन्हाळ्यात पापड मिरच्यांचा सोबत
गार गादीवर चांदण्या मोजूयात.
लाडके मांजर आणि झोका,
खिडकीतून खोलीत येणारा दुष्ट पिवळा बोका!
मागच्या दाराने त्याला बागेत हाकलूयात.
हे सारे परत एकदा उपभोगूयात.
आज जगात कुठेही असलो,
तरी मनाते आपण सगळे लहानपणीच्या सावलीतच फिरतो...
पुन्हा एकदा एकत्र राहून बघूयात.
ते दिवस शेवटचे जगून घेऊयात!
- नताशा बेडेकर

No comments:
Post a Comment
Thanks for enjoying some quietHappiness.
Please drop a comment if you relate to my writings.
Always appreciate your feedback :)